Ladki Bahin Yojana Mobile Gift Form Link, महिलांना मिळणार मोफत मोबाईल ?

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.4/5 - (1893 votes)

लाडकी बहीण योजनेत Ladki Bahin Yojana Mobile Gift असे मेसेज सोशल मीडियावरती खूपच व्हायरल होत आहेत आणि त्याविषयी माहिती देणारा हा लेख आहे. म्हणजेच तुम्हाला मोबाईल मिळू शकतो का आणि मिळणार असेल तर त्यासाठी काय प्रक्रिया असेल किंवा लाडकी बहीण योजनेचे मोबाईल प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहिण योजना राबविण्यात येत आहे आणि या योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलांना वर्षाला १८ हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आता याच योजनेत mobile gift मिळणार असे मेसेज पसरत आहेत.

महत्त्वाचे मुद्दे:

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना सुरू
  • आतापर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेचे 5 हप्ते वितरित
  • लाडकी बहिण योजना अंतर्गत मोबाईल गिफ्ट असे संदेश देणारे मेसेज
  • लाडकी बहीण योजनेतील मोबाईल गिफ्ट चे मेसेज खरे आहेत की खोटे

Ladki Bahin Yojana Mobile Gift

राज्यातील कोट्यावधी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे आणि अशातच सोशल मीडियावरती लाडकी बहीण योजना अंतर्गत मोबाईल गिफ्ट मिळणार आहे असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजना अंतर्गत मोबाईल मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही अर्ज करायचा आहे अशा पद्धतीचे मेसेज व्हायरल होत आहे आणि त्यामुळे राज्यातील लाखो महिला स्कॅमला बळी पडण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पैशांची वितरण करण्यासाठी राज्याच्या तिजोरी वरती 45000 कोटींचा बोजा पडलेला आहे आणि अशातच लाडकी बहीण योजना अंतर्गत मोबाईल किंवा इतर भेट वस्तू देणे शक्य नाही.

सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना खूपच प्रसिद्ध योजना आहे आणि याचाच फायदा घेऊन काही समाजकंटक राज्यातील महिलांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Ladki Bahin Yojana Mobile Gift Form

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणताही ladki bahin yojana mobile gift form देण्यात आलेला नाही ज्या अंतर्गत तुम्ही फ्री मध्ये मोबाईल फोन मिळवू शकाल. महाराष्ट्र राज्य शासनाने फ्री मोबाईल वाटप संदर्भात कोणतेही शासन निर्णय जाहीर केलेले नाही.

महाराष्ट्रातील विविध सुशिक्षित तसेच अशिक्षित महिला मोबाईल स्कॅमला बळी पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अशा व्हिडिओ तसेच व्हायरल मेसेज पासून दूर रहावे असा सल्ला देण्यात आला आहे.

म्हणजेच youtube किंवा इतर सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेले विविध मोबाईल गिफ्ट मिळणारे संदेश खोटे आहेत आणि जर तुम्हाला कोणताही ॲप डाऊनलोड करून त्यावरती माहिती भरण्यास सांगितले तर तुम्ही ती माहिती भरू नका.

Ladki Bahin Yojana Mobile Gift Form Link

लाडकी बहीण योजनेचे ऑफिशियल संकेतस्थळ ladakibahin.maharashtra.gov.in आहे. शासनाच्या ऑफिशियल संकेतस्थळावरती लाडकी बहीण योजनेचे विविध अपडेट देण्यात येतात.

जर तुम्ही ladki bahin yojana mobile gift form link शोधत असाल तर अद्याप शासनाच्या माध्यमातून अशी कोणतीही वेबसाईट जाहीर करण्यात आलेली नाही. याच बरोबर जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अर्ज जरी करायचा असेल तर त्याचे अधिकार फक्त अंगणवाडी सेविकांनाच देण्यात आले आहेत.

कोणत्याही फ्रॉड ॲप मध्ये आपल्या बँकेचे तपशील किंवा इतर महत्त्वाची माहिती दिली तर आपण विविध संकट मध्ये पडू शकतो आणि त्यामुळे आपले मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

यापूर्वी पण पीएम किसान योजना सुरू झाल्यानंतर अशाच प्रकारचे विविध चुकीचे मेसेज पसरवले जात होते आणि त्यामध्ये ॲप डाऊनलोड करणाऱ्या आणि माहिती भरणाऱ्या व्यक्तींचे बँक खाते रिकामी झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

आता लाडकी बहीण योजनेसाठी पण अशाच पद्धतीचे स्कॅम सुरू झालेले आहेत आणि आपण अशा कोणत्याही ॲप मध्ये आपले बँकेचे तपशील देऊ नका.

अंगणवाडी सेविका किंवा इतर शासकीय फॉर्म भरणाऱ्या महिलांना मोबाईल देण्याचे जीआर यापूर्वीच तीन-चार वर्षांपूर्वी देण्यात आले होते आणि त्यानंतर आता या संदर्भात कोणतेही जीआर काढण्यात आलेले नाही तसेच सामान्य महिलांना मोबाईल देण्याचा GR निर्गमित करण्यात आलेला नाही.

महाराष्ट्रातील दोन-तीन तालुक्यातील तलाठी वर्गासाठी मोबाईल डेटा पॅक चे पैसे देण्यासाठी शासनाचा शासन निर्णय जाहीर करण्यात येतो तर मोबाईल सारख्या वस्तूसाठी बिना शासन निर्णयाची अंमलबजावणी करता वाटप करणे अशक्य आहे.

राज्यात काही आमदारांकडून पैठणी किंवा साडी वाटप केले जात आहे परंतु हे सर्व ते फक्त त्यांच्या मतदारसंघांमध्येच करत आहे आणि संपूर्ण राज्यभरामध्ये लाडकी बहीण योजना अंतर्गत अशा प्रकारचे वस्तूंचे वाटप शासन करत नाही.

नवीन फॉर्मलाभार्थी यादी

लाडकी बहीण योजना राज्य शासनाची एक महत्वकांक्षी योजना आहे आणि या योजनेमध्ये महिलांना प्रति महिना 18000 ची राशी देण्यात येते. दोन करोड पेक्षा जास्त महिला या योजनेमध्ये पात्र आहेत आणि त्यामुळेच महिलांना फसवण्यासाठी वेगवेगळे ॲप मार्केटमध्ये येत आहेत आणि अशा फ्रॉड ॲप पासून महिलांनी स्वतः दूर रहावे.

2 thoughts on “Ladki Bahin Yojana Mobile Gift Form Link, महिलांना मिळणार मोफत मोबाईल ?”

  1. My form was rejected bcoz of by mistakelly I uploaded passbook on the plance of back side of aadhar card and on the place of passbook I uploaded another passbook documents that I don’t want to upload …bcoz of network failure or server issues did this mistake help me for the same.

    उत्तर

Leave a Comment