लाडकी बहीण योजना जुलै 2025 च्या हप्त्याचे वितरण सुरू, काही महिलांना मिळणार तीन हजार रुपये

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 1/5 - (1 vote)

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ही योजना अत्यंत यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे परंतु या योजनेमध्ये काही महिलांना जून महिन्याचा हप्ता देण्यात आलेला नव्हता.

तसेच जुलै महिन्यामध्ये काही महिलांना हप्ता मिळणार नाही याविषयीचे संपूर्ण अपडेट आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत तसेच कोणत्या महिलांना तीन हजार रुपये मिळतील तसेच कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत विषयी पण आपण जाणून घेणार आहोत.

महत्त्वाचे मुद्दे:

  1. जुलै 2025 चा हप्ता वितरण सुरू
  2. 06 ऑगस्ट 2025 पासून महिलांना जुलै लाडकी बहीण योजना लाभ
  3. काही महिलांना महिला तीन हजार रुपये तर काही महिलांना मिळणार पंधराशे रुपये

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2025 हप्ता

महाराष्ट्र राज्य शासनामार्फत राबवण्यात येणारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना 06 ऑगस्ट 2025 पासून जुलै 2025 च्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे तसेच रक्षाबंधनापर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे वर्गीत करण्यात येतील अशी शक्यता आहे.

राज्य शासनाच्या माध्यमातून जुलै 2025 चा हप्ता आठ ऑगस्ट रोजी वितरित करण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली होती परंतु त्यानंतर शनिवार आणि रविवार विविध सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे लाखो महिला लाडकी बहिणींना जुलै 2025 चा हप्ता सहा ऑगस्ट पासून देण्यात सुरुवात झाली आहे.

लाडकी बहीण योजना तीन हजार रुपये

काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे कारण ज्या लाडक्या बहिणींची पडताळणी प्रक्रिया पेंडिंग मध्ये होती अशा महिलांना जून महिन्याचा हप्ता देण्यात आलेला नव्हता आणि त्यामुळे जून तसेच जुलै महिन्याचा एकत्रित हप्ता सदर महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

लाडकी बहीण योजनेमध्ये विविध अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे राज्य शासनाच्या निदर्शनात आल्यानंतर राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात अर्जांची पडताळणी सुरू आहे आणि अपात्र महिला लाभार्थ्यांचे लाभ बंद करण्यात येत आहेत.

या महिलांना नाही मिळणार हप्ता

लाडकी बहीण योजनेचे फॉर्म डबल चेक करण्यात येत आहे तसेच कागदपत्रांची परत पडताळणी करण्यात येत आहे. जर तुमचा फॉर्म शासकीय प्रक्रियेमध्ये पेंडींग स्वरूपामध्ये असेल तर तुमचा फॉर्म मंजूर होईपर्यंत तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ स्थगित करण्यात येईल आणि तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर परत तुम्हाला राहिलेल्या सर्व महिन्यांचे हप्ते देण्यात येतील.

बऱ्याच महिलांना आधी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता परंतु जून महिना किंवा त्यानंतर जुलै महिन्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही यामागील मोठे कारण म्हणजे तुमचा अर्ज शासकीय प्रक्रियेमध्ये परत पडताळणी मध्ये pending स्वरूपामध्ये असू शकतो आणि त्यामुळे तुमचा काही महिन्यांचा लाभ स्थगित करण्यात आलेला असू शकतो.

जर तुम्ही पात्र लाभार्थी महिला असाल तर घाबरण्याचे कोणतेही कारण नाही कारण तुमचा अर्ज परत पडताळणी मध्ये मंजूर झाल्यानंतर तुम्हाला राहिलेल्या महिन्यांचे हप्ते एकाच वेळेस बँकेमध्ये वितरित करण्यात येतील.

Leave a Comment